Pune | Mon, 29 June 2026

Ad

अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

Sunil Goyal | 10 views
अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. १० : रायगड जिल्ह्यातील आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्राला चालना देणाऱ्या अलिबाग येथील १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तसेच ५०० खाटांचे रुग्णालय व अनुषंगिक इमारतींच्या बांधकाम प्रकल्पाच्या प्रगतीचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आढावा घेतला. सर्व कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले. मंत्रालयात आयोजित या संदर्भात बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त अनिल भंडारी, दूरदृष्य प्रणालीद्वारे अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अलिबाग येथे उभारण्यात येणारे हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रायगड जिल्ह्यासह कोकण विभागातील नागरिकांसाठी आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या नव्या संधी निर्माण होण्याबरोबरच ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना दर्जेदार उपचार सेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार असल्याचा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp