शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री राजीव जालनापुरकर यांच्या हस्ते राष्ट्रीय खेळाडू डॉ.सुषमा तायडे यांना गौरव मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यावतीने वार्षिक क्रीडा पारितोषक समारंभा पुणे विद्यापीठात पार पडला याप्रसंगी अनेक खेळाडू तसेच अनेक क्रीडा संचालकांना त्यांच्या कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे श्रीरामचंद्र अभियांत्रिक महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका डॉ. सुषमा तायडे यांनी युवकांच्या क्रीडा विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्याची दखल घेत श्री राजीव जालनापुरकर यांच्या हस्ते गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

