Pune | Tue, 17 March 2026

Ad

भारतासह सहा मित्र देशांमधील सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट

Sunil Goyal | 3 views
भारतासह सहा मित्र देशांमधील सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि.१७ : नॅशनल डिफेन्स कॉलेज येथे प्रशिक्षण घेत असलेल्या भारत व सहा मित्र देशातील वरिष्ठ सैन्य दल व नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या एका १७ सदस्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

शिष्टमंडळामध्ये भारतीय नौदल, वायुदल व स्थलसेनेतील ब्रिगेडियर दर्जाचे अधिकारी तसेच राजस्व सेवेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्याशिवाय रशिया, ओमान, इंडोनेशिया, नायजेरिया, नेपाळ व टांझानिया या मित्र देशांचे वरिष्ठ सैन्य अधिकारी देखील उपस्थित होते. नॅशनल डिफेन्स कॉलेज येथील वरिष्ठ सल्लागार मेजर जनरल हरकिरत सिंह यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ सध्या मुंबई व पुणे येथे अभ्यास दौऱ्यावर आले आहे.

 

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp