Pune | Mon, 16 March 2026

Ad

बोरीवलीत १३ मार्च रोजी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा’

Sunil Goyal | 5 views
बोरीवलीत १३ मार्च रोजी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा’

मुंबई, दि.१०: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर आणि सायली पदवी महाविद्यालय, बोरीवली यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील तरुण-तरुणींसाठी भव्य ‘महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा १३ मार्च, २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत. सायली पदवी महाविद्यालय, गोराई नगर, बोरीवली (पश्चिम), मुंबई येथे होईल.

मुंबईतील नामांकित कंपन्या या मेळाव्यात सहभागी होणार असून, उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन प्राथमिक निवड केली जाईल. शासनाच्या विविध महामंडळांमार्फत उपलब्ध असणाऱ्या सवलतीच्या कर्ज योजनांची माहिती येथे दिली जाईल. उमेदवारांना मोफत प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या विविध प्रशिक्षण संस्था या मेळाव्यात उपस्थित राहतील. महाराष्ट्र शासनाची ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ आणि ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना’ अंतर्गत प्रशिक्षणाचा लाभ घेण्याची संधी उमेदवारांना मिळेल.

या मेळाव्यासाठी १० वी, १२वी उत्तीर्ण, आय.टी.आय तसेच विविध शाखांचे पदवीधर उमेदवार पात्र आहेत. जास्तीत जास्त उमेदवारांनी आपल्या आवश्यक कागदपत्रांसह नमूद पत्त्यावर उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर शैलेश अर्जुनराव भगत यांच्या वतीने करण्यात आले आहे.

०००

संध्या गरवारे/वि.सं.अ.

आमच्यात सामील व्हा

ताज्या बातम्या
Youtube

Join WhatsApp