Pune | Sat, 20 June 2026

Ad

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा उपलब्ध

Sunil Goyal | 1 views
दहावी-बारावी पुरवणी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा उपलब्ध

मुंबई, दि. २० जून : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जून-जुलै २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) पुरवणी परीक्षांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना मानसिक आधार व मार्गदर्शन मिळावे यासाठी विविध स्तरांवर समुपदेशन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

राज्य मंडळाच्या माहितीनुसार, दहावीची पुरवणी परीक्षा दि. ३० जून २०२६ पर्यंत, तर बारावीची पुरवणी परीक्षा दि. ८ जुलै २०२६ पर्यंत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात आली आहे.

परीक्षा काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य मंडळ स्तरावर समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याशी ७२०८४२९३८१, ९४०४७८३९९६ आणि ९९६०६४४४११ या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे.

यंदापासून मंडळाच्या वतीने मुक्तांगण मित्र संस्थेमार्फत इयत्ता दहावी व बारावी परीक्षांशी संबंधित विद्यार्थी, पालक आणि इतर घटकांना समुपदेशन सेवा उपलब्ध करून देण्यात येत असून त्यासाठी ९११२७०९११२ हा हेल्पलाईन क्रमांक कार्यरत आहे. तसेच टेलीमानस हेल्पलाईन क्रमांक १४४१६ आणि मनोदर्शन हेल्पलाईन क्रमांक ८४४८४४०६३२ यांवरही समुपदेशन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत ३१५ समुपदेशकांची सेवाही उपलब्ध करून देण्यात आली असून त्यांचे संपर्क क्रमांक व पत्ते महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

पुरवणी परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा ताण किंवा संभ्रम न बाळगता उपलब्ध समुपदेशन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी केले आहे.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp