Pune | Thu, 14 May 2026

Ad

कोळसा खाणींमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड कंपनीने तातडीने उपाययोजना कराव्यात – मंत्री शंभूराज देसाई

Sunil Goyal | 2 views
कोळसा खाणींमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड कंपनीने तातडीने उपाययोजना कराव्यात – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. ६ : चंद्रपूर जिल्ह्यात कोळशाच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या  प्रदूषणविषयक समस्यांवर  पर्यावरण, खनिकर्म, परिवहन व  स्थानिक प्रशासन  यांनी सुचविलेल्या सूचनांची  वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने  कंपनीनीने अंमलबजावणी करावी असे निर्देश खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. स्थानिक नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड  कंपनीने आपल्या कार्यपद्धतीत तातडीने बदल करणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे चंद्रपूर जिल्ह्यातील  कोळसा उत्खनन व वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता उपाययोजना करण्याबाबत आयोजित बैठकीत खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई बोलत होते. या बैठकीला आमदार कृपाल तुमाने, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाचे संचालक डॉ. गजानन कामडे, चंद्रपूरचे निवासी जिल्हाधिकारी दगडू कुंभार हे व्हीसीव्दारे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रधान वैज्ञानिक अधिकारी डॉ विश्वजीत ठाकूर,जिल्हा खनिकर्म अधिकारी चंद्रपूर वसीम सय्यद, जिल्हा पोलीस अधिक्षक चंद्रपूर आयुष नोपानी यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, चंद्रपूर येथे कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था होत आहे. नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम होवून शेतीचे नुकसान होत आहे. तसेच कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ताडपत्री नसणे, कोळशाचे कण उडून प्रदूषण होणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचा मुद्दा लोकप्रतिनिधींनी मांडला आहे वरील सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी पर्यावरण, खनिकर्म, परिवहन व  स्थानिक प्रशासन  यांनी संयुक्त उपाययोजना कराव्यात त्याची अंमलबजावणी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने  कंपनीनीने करावी.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांनी ताडपत्रीचे आच्छादन करावे. परिवहन विभागाने भरारी पथकांची संख्या वाढूवन परिसरात वाहतूक नियमांचे पालन होत आहे का ते पहावे. कोळसा उत्खनन करणाऱ्या कंपनीने शासनाने दिलेल्या नियमांचे पालन केले नाही तर संबधित कंपनीवर  दंडात्मक कारवाई करण्यात येतील असेही मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

0000

संध्या गरवारे/विसंअ

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp