
मुंबई, दि. २: कुकडी प्रकल्पाशी संबंधित प्रलंबित कामे कालबद्ध रीतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा आशा सूचना करत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी डिंभे डावा कालवा दुरुस्तीची कामे, मीना पुरक कालवा तसेच मीना शाखा कालवा दुरुस्तीची कामे आणि पिंपळगाव जोगे डावा कालवा दुरुस्तीच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या या बैठकीस
आमदार शरद सोनवणे, जलसंपदा विभागाचे सचिव जयंत बोरकर, मुख्य अभियंता संजीव चोपडे, सहसचिव सविता बोधेकर तर दूरदृश्य प्रणालीद्वारे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हणमंत धुमाळ, मुख्य अभियंता अलका अहिरराव उपस्थित होत्या.
बैठकीत चर्चा झालेल्या विषयांच्या कामांना गती देण्यासाठी आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या. या कामांमुळे या भागातील सिंचन व्यवस्था अधिक सक्षम होण्यास, जलस्रोतांचे प्रभावी व्यवस्थापन होण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले.
०००००
एकनाथ पोवार/स.सं.
