Pune | Fri, 15 May 2026

Ad

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

Sunil Goyal | 1 views
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

सातारा, दि. १५ : सतारानगरीचा थाट, सातारवासियांची मोठी उपस्थिती आणि उत्साही वातावरणात आतषबाजीसह  सातारा नगरपरिषदेने उभारलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान, पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, आमदार सर्वश्री महेश शिंदे, सुनील कांबळे, अमित गोरखे, नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष दत्ता बनकर व नगरसेवक यांच्यासह सातारावासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या प्रती देऊन स्वागत केले.

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp