Pune | Tue, 17 March 2026

Ad

लष्करप्रमुखांचे प्रशंसा पदक सुशील गायकवाड यांना प्रदान

Sunil Goyal | 11 views
लष्करप्रमुखांचे प्रशंसा पदक सुशील गायकवाड यांना प्रदान

नवी दिल्ली, दि. २१: संरक्षण मंत्रालयातील ऑपरेशन आणि लॉजिस्टिक्स संचालनालयात कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असताना २०२५ साली केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र सदनचे गुंतवणूक निवासी आयुक्त  सुशील गायकवाड यांना भारतीय लष्करप्रमुखांचे प्रशंसा पदक देऊन गौरविण्यात आले.

नवी दिल्ली येथील संरक्षण मंत्रालयात आयोजित एका विशेष सोहळ्यात उपलष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह यांच्या हस्ते हे पदक प्रदान करण्यात आले.

सुशील गायकवाड यांनी संरक्षण मंत्रालयात सेवा बजावत असताना विशेषतः ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान ऑपरेशन आणि लॉजिस्टिक्स विभागात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी केलेले लॉजिस्टिक्स व्यवस्थापन आणि धोरणात्मक नियोजनामुळे या मोहिमेला सहकार्य मिळाले. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेची दखल घेत भारतीय लष्करप्रमुखांनी त्यांना हे पदक देण्यात आले आहे.

०००

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp