
मुंबई, दि. १: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या 113 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन येथे वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
यावेळी राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे तसेच लोकभवनातील कर्मचारी व अधिकारी तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
००००
जसंअ/लोकभवन
