Pune | Mon, 29 June 2026

Ad

माथाडी मंडळ आस्थापनेवरील पदभरतीकरिता उमेदवारांना परीक्षा शुल्क भरण्यास मुदतवाढ

Sunil Goyal | 14 views
माथाडी मंडळ आस्थापनेवरील पदभरतीकरिता उमेदवारांना परीक्षा शुल्क भरण्यास मुदतवाढ

मुंबई, दि. १०: माथाडी मंडळ आस्थापनेवरील पदभरतीकरिता उमेदवारांना परिक्षा शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, 1981 कलम 6 अन्वये स्थापित विविध सुरक्षा रक्षक मंडळे व महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, 1969 कलम 6 अन्वये स्थापित विविध माथाडी मंडळे यांचे आस्थापनेवरील सेवाप्रवेश नियम शासन परिपत्रक क्र.युडब्लूए-2016/प्र.क्र.01/कामगार-5, दिनांक 11 फेब्रुवारी, 2021 नुसार खालील संवर्गातील एकूण 22 माथाडी मंडळे व 12 सुरक्षा रक्षक मंडळांतर्गत निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंकलेखक संवर्गातील पदांच्या सरळसेवा पद्धतीने गट-क मधील रिक्त पदे भरती जाहिरात 13.05.2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

त्यानुसार उमेदवारांचे अर्ज 11.06.2026 रोजी 23.55 वाजेपर्यंत यशस्वीपणे दाखल झाले असतील अशा उमेदवारांना अर्जाचे परीक्षा शुल्क भरण्याकरिता 12.06.2026 रोजी 23.55 वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेली होती. तथापि, शुल्क भरण्याकरिता काही तांत्रिक अडचणी उमेदवारांना येत असल्यामुळे शुल्क भरण्याच्या कालावधीमध्ये 18.06.2026 रोजी23.55 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. ही मुदतवाढ 11.06.2026 रोजी पर्यंत अर्ज भरण्यात आलेल्या उमेदवारांना केवळ शुल्क भरण्याकरिता देण्यात येत आहे याची नोंद घ्यावी, असे सह आयुक्त कामगार तथा सदस्य सचिव, माथाडी व सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिया समिती, मुंबई यांनी कळविले आहे.

अधिक माहितीकरीता https://mahakamgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

००००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp