Pune | Thu, 14 May 2026

Ad

महाराष्ट्र दिनाच्या वर्धापन दिनी विभागीय आयुक्तालयात ध्वजारोहण व मानवंदना

Sunil Goyal | 8 views
महाराष्ट्र दिनाच्या वर्धापन दिनी विभागीय आयुक्तालयात ध्वजारोहण व मानवंदना

अमरावती, दि. १ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या वर्धापन दिनोत्सवा निमित्त अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात प्रभारी विभागीय आयुक्त तथा अपर आयुक्त अजय लहाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन तिरंग्यास मानवंदना देण्यात आली. श्री. लहाने यांनी यावेळी उपस्थित सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व राज्यगीतानंतर पोलीस पथकाव्दारे तिरंग्यास मानवंदना देण्यात आली.

यावेळी कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे-पाटील, अपर आयुक्त संजय जाधव, सुरज वाघमारे, उपायुक्त संतोष कवडे, राजीव फडके, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, नायब तहसीलदार मधुकर धुळे, श्यामसुंदर देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी  यावेळी उपस्थित होते.

 00000

  उपसंचालक (माहिती)

 विभागीय माहिती कार्यालय,अमरावती

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp