
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा
मुंबई, दि 18 : ‘महाराष्ट्रधर्म वाढवुया… मराठीची गुढी उंच उभी करुया..’ या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी नववर्ष प्रारंभ अर्थात गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या या संदेशात म्हटले आहे की,’ नववर्ष आपल्या सर्वांसाठी सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो. सर्वांच्या आशा-आकांक्षा आणि मनोकामना पूर्ण करणारे ठरावे. नवसंकल्पना साकार व्हाव्यात यासाठी ऊर्जा देणारे ठरावे त्यासाठी सर्वांना निरामय आरोग्य लाभो, हीच प्रार्थना. यातून लाभणाऱ्या नवचैतन्यातून महाराष्ट्रधर्म वाढविण्याचा… मराठीची गुढी आणखी उंच उभी करण्याचा निर्धार करुया !’
OOOO
