Pune | Wed, 13 May 2026

Ad

महिला व बाल विकास प्रकल्पांना गती देण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

Sunil Goyal | 4 views
महिला व बाल विकास प्रकल्पांना गती देण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

मुंबई, दि. १२ : दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या महिला व बाल विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी तसेच विभागाची शासकीय कार्यालये उभारण्यासाठी मौजे मानखुर्द येथील सोसायटीच्या जमिनीचा भाडेपट्टा वाढवून देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

चेंबूर येथील दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागेवरील विविध संस्थांच्या कामकाजाचा तसेच पुनर्विकासासंदर्भातील आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला व बाल विकास आयुक्त माधवी सरदेशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी पद्माकर रोकडे तसेच एसआरए, बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महिला व बाल विकास विभागातील मंत्रालयीन अधिकारी आणि दि चिल्ड्रेन एड सोसायटीचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, ही संस्था बाल न्याय व्यवस्थेअंतर्गत कार्यरत असून मुंबई शहर व उपनगर परिसरात विविध बालगृहे, निरीक्षणगृहे, औद्योगिक शाळा, दिव्यांग बालगृहे तसेच शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. या इमारतींना अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देणे तसेच काही इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.

संबंधित जमिनीचे लीज नूतनीकरण करून नव्याने बाल विकास प्रकल्प राबविण्यास परवानगी देण्याबाबतही आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

0000

श्रद्धा मेश्राम/विसंअ

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp