Pune | Tue, 17 March 2026

Ad

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई (गट-ड) पदांची निवड यादी जाहीर

Sunil Goyal | 9 views
नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई (गट-ड) पदांची निवड यादी जाहीर

मुंबई, दि.25 : नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई (गट-ड) संवर्गातील 284 रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेअंतर्गत आयबीपीएस कंपनीमार्फत जुलै 2025 मध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल 20 ऑगस्ट 2025 रोजी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला होता.

उत्तीर्ण उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड यादी, प्रतीक्षा यादी, निवडीसाठी नकार दिलेल्या उमेदवारांची यादी, अपात्र उमेदवारांची यादी तसेच कागदपत्र पडताळणीस गैरहजर राहिलेल्या उमेदवारांची यादी 10 फेब्रुवारी 2026 रोजी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.igrmaharashtra.gov.in  येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे मुंबई शहरचे सह जिल्हा निबंधक भरत गरुड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

००००

गजानन पाटील/स.सं

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp