Pune | Sat, 04 July 2026

Ad

फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे स्वागत

Sunil Goyal | 14 views
फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे स्वागत

मुंबई, दि. ०६: फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब भारताच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे आज दोन दिवशीय दौऱ्यासाठी मुंबईत आगमन झाले.

हॉटेल ताज पॅलेस येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने गणेश वंदन नृत्य सादर करून राज्याच्या संस्कृतीची ओळख त्यांना करून देण्यात आली. यावेळी मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे उपस्थित होते. यावेळी टाटा समूहाचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांची भेट घेतली.

०००

निलेश तायडे/विसंअ

आमच्यात सामील व्हा

ताज्या बातम्या
Youtube

Join WhatsApp