Pune | Wed, 13 May 2026

Ad

पंढरपूर येथे पाच एकर जागेत भक्तनिवास होणार – मंत्री शंभूराज देसाई

Sunil Goyal | 2 views
पंढरपूर येथे पाच एकर जागेत भक्तनिवास होणार – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. १३ : पंढरपूर येथे पाच एकर जागेत माजी सैनिक कल्याण विभाग, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे देवस्थान व पर्यटन विभागाच्या समन्वयातून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची जागा भक्तनिवासासाठी विकसित करण्याची कार्यवाही पर्यटन विभागाने करावी असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

मेघदूत शासकीय निवासस्थान येथे पंढरपूर येथील पर्यटन विभागाच्या जागेच्या विकासासंदर्भात  आयोजित बैठकीत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते.

यावेळी पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर पंढरपूर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ  महाराज (औसेकर) कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, पंढरपूर येथील पाच एकर जागेत माजी सैनिक कल्याण विभाग देवस्थान व पर्यटन विभागाच्या समन्वयातून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची जागा विकसित करण्यात यावी. सर्वांच्या सूचना लक्षात घेवून सर्वसमावेशक काम करण्यात यावे. असे निर्देशही पर्यटनमंत्री देसाई यांनी दिले.

0000

संध्या गरवारे/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp