Pune | Mon, 16 March 2026

Ad

परराज्यातील अवैध मद्य वाहतूक प्रकरणी कारवाई; २ कोटी ३० हजाराचा मुद्देमाल जप्त

Sunil Goyal | 5 views
परराज्यातील अवैध मद्य वाहतूक प्रकरणी कारवाई; २ कोटी ३० हजाराचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. १२ : ठाणे जिल्ह्यातील मुंबई – नाशिक महामार्गावर पडघा टोल नाक्याजवळ (ता. भिवंडी) येथे परराज्यातील मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने  कारवाई केली.

या कारवाईत गोवा स्पिरिट ऑफ स्मूथनेस व्हिस्कीच्या फॉर सेल इन ओन्ली मध्यप्रदेश या परराज्यातील विदेशी मद्याचे  २ हजार ३६४ बॉक्स मिळून आले. तसेच एमएच १२ टीव्ही ९००० क्रमांक असलेल्या १६ चाकी वाहनासह, दोन मोबाईल फोन असा एकूण २ कोटी ३० हजार ८०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत वाहनामधील आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून दोघांना अटक करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या आदेशानुसार कोकण विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली कोकण विभागाच्या भरारी पथकाकडून कारवाई करण्यात आली.

या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक रिंकेश दांगट करीत आहे, असे विभागीय भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक यांनी कळविले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे करीत आहेत.

0000

निलेश तायडे/विसंअ

 

आमच्यात सामील व्हा

ताज्या बातम्या
Youtube

Join WhatsApp