Pune | Sun, 17 May 2026

Ad

राजधानीत यशवंतराव चव्हाण जयंतीदिनी अभिवादन

Sunil Goyal | 20 views
राजधानीत यशवंतराव चव्हाण जयंतीदिनी अभिवादन

नवी दिल्ली, १२ : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी कोपर्निकस मार्ग येथील जुने महाराष्ट्र सदन येथे त्यांच्या प्रतिमेस आणि कस्तुरबा गांधी मार्ग येथील महाराष्ट्र सदनातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, सहायक लेखाधिकारी निलेश केदारे आणि महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्राच्या विकासातील आणि देशाच्या जडणघडणीतील ऐतिहासिक योगदानाचा परिचय करून दिला.

0000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली–वृत्त विशेष

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp