Pune | Tue, 17 March 2026

Ad

राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

Sunil Goyal | 2 views
राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली, दि. १६ मार्च : साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या २०२५ या वर्षासाठी प्रतिष्ठेच्या  पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशातील मान्यताप्राप्त २४ भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींना यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले असून मराठी भाषेतील ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथेसाठी लेखक राजू बाविस्कर यांना  पुरस्कार जाहीर झाला आहे.

साहित्य अकादमी ही भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत स्वायत्त राष्ट्रीय संस्था असून भारतीय भाषांमधील साहित्याच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविते. दरवर्षी अकादमीकडून विविध भाषांतील उत्कृष्ट साहित्यकृतींची निवड करून त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

मराठी साहित्यविश्वात महत्त्वपूर्ण ठरलेल्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथेत लेखकाने आपल्या आयुष्यातील अनुभव, सामाजिक वास्तव, संघर्ष आणि वैचारिक प्रवास यांचे प्रभावी चित्रण केले आहे. या साहित्यकृतीला मिळालेल्या  पुरस्कारामुळे मराठी साहित्यविश्वाचा गौरव वाढला आहे.

यंदाच्या पुरस्कारांमध्ये काव्यसंग्रह, कादंबरी, कथासंग्रह, निबंध, साहित्यिक समीक्षा, आत्मकथा आणि संस्मरण अशा विविध साहित्य प्रकारांतील विविध पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. देशातील विविध भाषांमधील साहित्यिक परंपरेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या साहित्यकृतींना तज्ज्ञांच्या समितीद्वारे निवडण्यात आले आहे. मराठी भाषेच्या पुरस्कारासाठी नियुक्त परीक्षक मंडळामध्ये ज्येष्ठ साहित्यिक मंगला गोडबोले, नागोराव तम्माजी उटकर आणि राजन गवस यांचा समावेश होता.

साहित्य अकादमी पुरस्कारामध्ये मानचिन्ह, शाल आणि एक लाख रुपये रोख रक्कम देण्यात येते. २०२५ च्या साहित्य अकादमी पुरस्कारांचे वितरण ३१ मार्च २०२६ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित विशेष समारंभात करण्यात येणार आहे.

 

साहित्य अकादमी पुरस्कार २०२५-भाषा, पुस्तक व लेखक पुढीलप्रमाणे :

 

असमिया – कड़ि खेलर साधु (उपन्यास) – देवब्रत दास

बांगला – श्रेष्ठ कबिता (कविता) -प्रसून बंदोपाध्याय

बोडो दोंनै लामाः मोनसे गाथोन (उपन्यास) – सहायसुलि ब्रह्म

डोगरी -‘ठाकुर’ सतसई (कविता, दोहे) – खजूर सिंह ‘ठाकुर’

इंग्रजी – क्रिमसन स्प्रिंग (उपन्यास) -नवतेज सरना

गुजराती – भट्टखडकी (कविता) – योगेश वैद्य

हिंदी – जीते जी इलाहाबाद (संस्मरण) – ममता कालिया

कन्नड -दडा सेरिसु तंदे* (कहानी) – अमरेश नुगडोणी

काश्मीरी – नजदावनेकी पॉट अलाव (कविता) – अली शैदा

कोंकणी – कोंकणी काव्यें: रुपां आनी रूपकां (आलोचनात्मक निबंध) -हेनरी मेंडोनका (एच. एम. पेरनाळ)

मैथिली – धात्री पात सन गाम (संस्मरण) – महेन्द्र

मलयाळम् – मायामानुष्यर (उपन्यास) – एन. प्रभाकरन

मणिपुरी – कंगलमद्रीब इफुत (कहानी) – हाओबम नलिनि

मराठी – काळ्यानिळ्या रेषा (आत्मकथा) – राजू बाविस्कर

नेपाली -नेपाली पारम्परिक संस्कृति र सभ्यताको ढुकुटी (निबंध) -प्रकाश भट्टराई

ओड़िआ – पदपुराण (कविता) – गिरिजाकुमार बलियारसिंह

पंजाबी – सेफ्टी किट (कहानी) -जिंदर

राजस्थानी -भरखमा (कहानी) – जितेंद्र कुमार सोनी

संस्कृत -प्रस्थानचतुष्टये ब्रह्मघोषः (कविता) – महामहोपाध्याय साधु भद्रेशदास

संताली – मिड बिर्ना चेनने साओन इनाग सागई (कहानी) -सुमित्रा सोरेन

सिंधी – वाघू (कहानी) – भगवान अटलानी

तमिळ – तमिळ सिरुकथैयिन थडंगल (साहित्यिक आलोचना) – सा. तमिळसेलवन

तेलुगु -अनिमेष (कविता) – नंदिनी सिद्धरेड्डी

उर्दू -सफ़र जारी है (कविता) -प्रितपाल सिंह बेताब

००००

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली–वृत्त विशेष – ७२/ दि.१६.३.२०२६

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp