Pune | Wed, 13 May 2026

Ad

राज्यपालांच्या हस्ते तापती भौमिक मजूमदार यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

Sunil Goyal | 3 views
राज्यपालांच्या हस्ते तापती भौमिक मजूमदार यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई दि.१३ : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी त्रिपुरा येथील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलाकार  श्रीमती तपती भौमिक मजूमदार यांच्या “भूमिजा — बॉर्न ऑफ द अर्थ” या कला प्रदर्शनाचे मंगळवारी जहांगीर कलादालन मुंबई येथे उद्घाटन केले. राज्यपालांनी कलाकृतींच्या सर्जनशीलतेचे कौतुक करताना  तपती भौमिक मजूमदार यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाला अभिनेत्री जयती भाटिया, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे प्रा. मारुती शेळके, साध्वी मजूमदार  तसेच कला प्रेमी उपस्थित होते. हे प्रदर्शन दिनांक १८ मे पर्यंत खुले आहे.

000000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp