Pune | Tue, 17 March 2026

Ad

राऊळगाव स्फोटातील जखमींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट

Sunil Goyal | 13 views
राऊळगाव स्फोटातील जखमींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट

नागपूर, दि. २ :राऊळगाव स्फोटातील जखमींची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल या स्फोटके निर्माण करणाऱ्या कंपनीत रविवारी सकाळी स्फोट होऊन १९ श्रमिकांचा मृत्यू झाला, तर जवळपास २३ जण गंभीर जखमी झाले. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सायंकाळी ऑरेंज सिटी हॉस्पिटल येथे जखमींची भेट घेऊन डॉक्टरांशी संवाद साधला. या घटनेतली सर्व जखमींवर आवश्यक ते सर्व उपचार करण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी जखमींच्या कुटुंबियांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन त्यांना धीर दिला, तसेच शासन तुमच्या सोबत असल्याचा विश्वास दिला.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp