Pune | Mon, 29 June 2026

Ad

शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात शहापूर येथे अंत्यसंस्कार

Sunil Goyal | 9 views
शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात शहापूर येथे अंत्यसंस्कार

सातारा, दि. १२ : शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या पार्थिवावर आज शहापूर ता. कराड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली.

यावेळी आमदार मनोज घोरपडे, आमदार डॉ. अतुल भोसले, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ओमकार कापले, गटशिक्षणाधिकारी प्रताप पाटील यांच्या सह विविध विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी शहीद जवान अर्जुन जाधव यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.

यानंतर वीर पत्नी सायली, मुलगा सर्वेश, वीर पिता राजेंद्र, वीर माता सुरेखा, भाऊ ऋषिकेश, बहिणी रेश्मा चव्हाण, पूनम पाटील यांनी अंतिम दर्शन घेतले. यानंतर शहीद अर्जुन जाधव यांच्या पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी लष्कराचे आजी, माजी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

0000

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp