Pune | Thu, 14 May 2026

Ad

टेक वारी अंतर्गत ‘टेक वारी तालरंग’ कार्यक्रमात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतला नादमाधुर्याचा आनंद

Sunil Goyal | 7 views
टेक वारी अंतर्गत ‘टेक वारी तालरंग’ कार्यक्रमात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतला नादमाधुर्याचा आनंद

मुंबई, दि. : सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयोजित टेकवारी . अंतर्गतमहाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताहकार्यक्रमातटेक वारी तालरंगया वाद्यांच्या कार्यक्रमाने मंत्रालयातील अधिकारीकर्मचाऱ्यांना मंत्रमुग्ध केले. अधिकारीकर्मचाऱ्यांनी ढोलकी, संबळ या वाद्यांच्या स्वरनादाचा आनंद घेतला.

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित तालरंग कार्यक्रमाच्या माध्यमातून ढोलकीसंबळच्या ठेक्यांनी परिसर दणाणून गेला. कलाकार निलेश परब (ढोलकीसंबळ वादक) आणि कृष्णा मुसळे (ढोलकी वादक) यांनी आपल्या सादरीकरणातून तालरंगाची रंगत अधिक खुलवली.तालरंग कार्यक्रमाची सांगता निलेश परब आणि कृष्णा मुसळे यांच्या ढोलकी वादनाच्या जुगलबंदीने झाली. या जुगलबंदीस उपस्थित अधिकारीकर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.

टेक वारी . या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत टाळ्यांच्या गजरात करण्यात आले. तसेच तालरंगची सुरुवात गणपती वंदनेने करण्यात आली. या कार्यक्रमात ढोलकी, ढोल, संबळ, बासरी आदी वाद्यांच्या सहाय्याने गोंधळगीत कोळीगीतांचे सादरीकरण करून उपस्थितांचे मनोरंजन करण्यात आले.

तालरंग या कार्यक्रमास मंत्रालयातील विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

०००
एकनाथ पोवार / विसंअ

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp