Pune | Thu, 14 May 2026

Ad

व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांची नॅशनल स्टॉक एक्सचेंजला भेट

Sunil Goyal | 9 views
व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांची नॅशनल स्टॉक एक्सचेंजला भेट

मुंबई, दि. : व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) मुख्यालयाला भेट देत प्रतिष्ठित ‘एनएसई बेल’ वाजवली. यावेळी त्यांनी एनएसईच्या कामकाजाची माहिती घेत भारतीय वित्तीय व्यवस्थेची पाहणी केली.

Oplus_131072

मुंबईतील बीकेसी येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंज येथे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी आज शिष्टमंडळासह भेट दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी एनएसईचे अध्यक्ष श्रीनिवास इंजेटी यांनी स्वागतपर भाषण केले.

यावेळी इंजेटी म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष तो लाम यांची भारतातील ही पहिली अधिकृत भेट आहे. त्यांनी भारतीय वित्तीय क्षेत्राशी संवादासाठी एनएसईची निवड केल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भारत आणि व्हिएतनाम हे दोन्ही देश उत्पादन, तंत्रज्ञान आणि भांडवली बाजाराच्या क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहेत. फेब्रुवारी 2024 मध्ये भारतातील उत्पादन प्रकल्पासाठी भूमिपूजन झाल्यानंतर अवघ्या 18 महिन्यांत पहिल्या वाहनाचे उत्पादन सुरू झाले आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार 16 अब्ज डॉलरच्या पुढे गेला असून 2030 पर्यंत तो 25 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. कार्यक्रमानंतर राष्ट्राध्यक्ष तो लाम आणि व्हिएतनामी प्रतिनिधीमंडळाने एनएसईच्या ट्रेडिंग व ऑपरेशन्स सुविधांची पाहणी केली.

०००

संजय ओरके/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp