
मुंबई, दि.२९ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या उपसभापतीपदाची निवडणूक बुधवार, १ जुलै २०२६ रोजी होणार असल्याची घोषणा विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केली.
सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधानपरिषद नियमातील नियम ७ मधील तरतुदींचा वापर करून १ जुलै ही तारीख निश्चित केली आहे. या निवडणुकीसाठी इच्छुक सदस्यांनी आपले प्रस्ताव आणि लेखी सूचना मंगळवार, दि. ३० जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव डॉ. विलास आठवले यांच्याकडे विधानभवनातील कक्ष क्रमांक ९०३ येथे सादर करावे लागणार आहेत. त्यानंतर प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या सूचना, नामनिर्देशनपत्रांची छाननी मंगळवार ३० जून २०२६ रोजी दुपारी एक वाजता होईल .
०००
शैलजा पाटील /विसंअ
