Pune | Fri, 15 May 2026

Ad

‘एमएमआरडीए’ आणि रायगड-पेण ग्रोथ सेंटर यांच्यात भागधारक करार

Sunil Goyal | 17 views
‘एमएमआरडीए’ आणि रायगड-पेण ग्रोथ सेंटर यांच्यात भागधारक करार

मुंबई, दि. १८: ‘एमएमआरडीए’ आणि रायगड-पेण ग्रोथ सेंटर यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भागधारक करार झाला.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे या करार कार्यक्रमास महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बळगन,  व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक व धोरण विषयक सल्लागार कौस्तुभ धवसे तसेच ऑरेंज सिटी ग्रुपचे निखिल गांधी उपस्थित होते.

कराराअंतर्गत विकसित होणाऱ्या बाबी

  • रायगड पेण ग्रोथ सेंटर लि.
  • एकीकृत टाऊनशिप निती प्रस्तावित
  • स्मार्ट सिटी म्हणून विकसित होणार
  • रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात विस्तार
  • प्रमुख बंदर क्षेत्राशी जोडलेले
  • आत्मनिर्भर टाऊनशिप

०००

केशव करंदीकर/व.स.सं.

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp