Pune | Thu, 02 July 2026

Ad

मणदूर प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर सांगली जिल्हाधिकारी यांनी बैठक घ्यावी – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Sunil Goyal | 1 views
मणदूर प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर सांगली जिल्हाधिकारी यांनी बैठक घ्यावी – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि.१ : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मणदूर येथील वारणा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी, सांगली यांनी सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसह लवकरात लवकर बैठक घेऊन मार्ग काढावा, असे निर्देश जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीस आमदार सत्यजित देशमुख, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, प्रभारी मुख्य अभियंता अलका अहिरराव तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वारणा प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसन, जमीन, मूलभूत सुविधा आणि इतर प्रलंबित प्रश्न संवेदनशीलतेने हाताळावेत. तसेच आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया गतीने पूर्ण करून प्रश्नांच्या सोडवणुकीस प्राधान्य द्यावे, असे निर्देश विखे-पाटील यांनी दिले.

आमदार सत्यजित देशमुख यांनी मणदूर परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणींची सविस्तर माहिती दिली.

००००००

एकनाथ पोवार/विसंअ

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp