Pune | Thu, 23 April 2026

Ad

‘महानीती’ प्लॅटफॉर्मचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

Sunil Goyal | 1 views
‘महानीती’ प्लॅटफॉर्मचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई, दि. २३ : महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला १ ट्रिलियन डॉलरच्या दिशेने वेग देण्यासाठी मित्रा यांच्या वतीने ‘महानीती’ ही एकात्मिक प्रणाली विकसित करण्यात आली आहे.या प्रणालीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मित्रा (महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, बीआयएसएजी-एन चे महासंचालक डॉ. टी. पी. सिंह, मित्राचे वरिष्ठ सल्लागार डॉ. विराज लोलियाना, संशोधन अधिकारी सुमेरन बालसेकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

ही प्रणाली ‘मुख्यमंत्री गती शक्ती’ या संकल्पनेवर आधारित असून याअंतर्गत नैसर्गिक साधनसंपत्ती व विविध मालमत्तांची सर्वसमावेशक माहिती प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. तसेच विविध प्रकल्पांचे नियोजन, अंमलबजावणी आणि निरीक्षणासाठी या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

000

काशीबाई थोरात/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp