Pune | Thu, 14 May 2026

Ad

आयआयएचटी बरगढ / वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरिता प्रवेश सूचना

Sunil Goyal | 2 views
आयआयएचटी बरगढ / वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरिता प्रवेश सूचना

मुंबई, दि. १४ : केंद्र सरकारच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील २०२६-२७ या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडीशा) करीता १३+१ (या व्यतिरिक्त वेंकटगिरी करिता २ जागा कॉन्सुलिंगच्या) घेण्याबाबत नमूद आहे. या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर/ सोलापूर/ मुंबई/ छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत विहीत नमुन्यात प्रवेश अर्ज १० जून २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत मागविण्यात येत आहेत.

त्याअनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी परिपूर्ण अर्ज दि. १०/०६/२०२६ पर्यंत संबंधित प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग आयुक्तालयाकडे सादर करावे. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या  www.dirtexmah.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयातदेखील उपलब्ध आहे, असे वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने यांनी कळविले आहे.

0000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp