Pune | Fri, 15 May 2026

Ad

एज्युसिटी व मेडिसिटीच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या उच्चशिक्षण संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunil Goyal | 9 views
एज्युसिटी व मेडिसिटीच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या उच्चशिक्षण संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • नामांकित विद्यापीठे कॅम्पस सुरु करण्यासाठी उत्सुक
  • प्रकल्पासाठी जागा त्वरित उपलब्ध करून देण्यावर भर देण्याचे निर्देश

मुंबई, दि १८: एज्युसिटी व मेडिसिटीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या विद्यापीठांतून उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. जगभरातील नामांकित विद्यापीठांनी येथे त्यांचे कॅम्पस सुरु करण्यासाठी उत्सुकता दर्शवली असल्याने संबंधित विभाग व यंत्रणांनी कालबद्ध वेळेत या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे एज्युसिटी व मेडिसिटी संदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणू गोपाल रेड्डी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एज्युसिटी व मेडिसिटीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या विद्यापीठांतून उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. जागतिक पातळीवरील अनेक नामांकित विद्यापीठांनी यासंदर्भात उत्सुकता दर्शवली असल्याने या नामांकित विद्यापीठांनी येथे त्यांचे कॅम्पस सुरु करण्यासाठी संबंधित विभाग व यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

प्रकल्प आराखडा तयार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एज्युसिटी व मेडिसिटी आकारास येईल. यासंदर्भातील प्रक्रिया सुरु झाली असून प्रकल्पासाठी जागा संपादित करण्यात येत असल्याची माहिती सिडकोच्या वतीने देण्यात आली. मेडीसीटीसाठीही आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.

स्टार्टअप आणि संशोधनला चालना मिळणार

जगातील नामांकित आणि अग्रगण्य विद्यापीठे देशात तसेच महाराष्ट्रात आपले कॅम्पस सुरु करत आहेत. या माध्यमातून विविध क्षेत्रातील दर्जेदार उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. तसेच स्टार्ट अप्सची संख्याही वाढेल. या विद्यापीठांच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

०००

केशव करंदीकर/व.स.सं.

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp