Pune | Thu, 14 May 2026

Ad

जनगणना उपक्रमाच्या सेल्फी पॉईंटचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन

Sunil Goyal | 6 views
जनगणना उपक्रमाच्या सेल्फी पॉईंटचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड , दि. १: देशात सुरू झालेल्या जनगणना-2027 च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत आजपासून जनगणना स्व-गणना प्रक्रिया सुरू झाली आहे. या उपक्रमाची जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सेल्फी पॉइंट तयार केला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते सेल्फी मोहिमेचे उद्घाटन झाले. तसेच त्यांनी स्वतः स्वगणना केली.
या मोहिमेद्वारे नागरिकांनी स्व-गणना करताना सेल्फी काढून सहभाग नोंदवावा आणि इतरांनाही या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
भारत सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यात 1 ते 15 मे 2026 कालावधीत स्व-गणना प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याद्वारे सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबाची माहिती स्वतः ऑनलाईन पद्धतीने अधिकृत se.census.gov.in या संकेतस्थळावर भरता येणार आहे. तर 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान घरनोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या महत्त्वपूर्ण अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून आपली जबाबदारी पार पाडावी, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
००००
आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp