Pune | Thu, 14 May 2026

Ad

महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

Sunil Goyal | 7 views
महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

 धुळे, दिनांक १  मे २०२६ (जिमाका वृत्त) : महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या सोहळ्याला अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, उपजिल्हाधिकारी संजय बागडे, चंद्रशेखर देशमुख, संदीप पाटील, जिल्हा नियेाजन अधिकारी सुनिल सोनार, तहसिलदार प्रविण चव्हाणके, यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिस दलाच्या वतीने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.

यावेळी पोलीस दलातर्फे संचलन करण्यात आले तसेच पोलीस बॅन्ड पथकाने  वंदे मातरम्, राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजविली.

०००००

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp