
मुंबई, दि. १ : महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रगान, राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले व राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्षा निवासस्थानी उपस्थित होते.
००००
