Pune | Mon, 22 June 2026

Ad

मुदत संपलेले व बंद हायड्रोप्रोजेक्ट कार्यान्वित करावेत – जलसंपदा मंत्री (कृष्णा व गोदावरी खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील

Sunil Goyal | 1 views
मुदत संपलेले व बंद हायड्रोप्रोजेक्ट कार्यान्वित करावेत – जलसंपदा मंत्री (कृष्णा व गोदावरी खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. २२ : कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मुदत संपलेले व बंद हायड्रोप्रोजेक्ट कार्यान्वित करण्यासाठी प्रक्रिया करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

मंत्रालयात कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ हनुमंत धुमाळ आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जलसंपदा विभागाव्दारे जलविद्युत प्रकल्पाच्या दुरुस्ती व पुर्नबांधणीबाबत धोरण ठरविण्यात आले आहे. हे प्रकल्प १९६३ ते २००२ या कालावधीमध्ये कार्यान्वित झाले आहेत त्यांचे आयुर्मान २४ वर्षे ते ६३ वर्षे दरम्यान आहे असे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यांमध्ये जलविद्युत प्रकल्प संख्या १६ असून स्थापित क्षमता २०७१ MW यासाठी मुदत संपलेले व बंद असलेले हायड्रोप्रोजेक्ट कार्यान्वित करण्यासाठी महामंडळ स्तरावर प्रक्रिया राबविणेत येईल. जलविद्युत प्रकल्पाचे सर्वसाधारण आयुर्मान ३५ वर्षे गृहित धरण्यात येते अशी माहिती देण्यात आली.

अहिल्यानगर शहरातील सीना नदीच्या पुनर्जीवन कामास गती देण्याचे निर्देश

अहिल्यानगर महानगरपालिका यांच्यामार्फत शहरातील सीना नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी जिल्हा नियोजन समिती मार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईल असे जलसंपदा मंत्री (कृष्णा व गोदावरी खोरे विकास महामंडळ) विखे पाटील यांनी सांगितले. जलसंपदा विभाग व अहिल्यानगर महानगरपालिका, यांच्या समन्वयाने शहरातील काटवन खंडोबा आणि शहर हद्दीतील सीना नदीची पुनर्जीवन काम करण्यात येत आहे. नदीच्या पुर्व व पश्चिम दोन्ही बाजुस काम करण्यात येणार आहे. या कामाची जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी भेट देऊन नुकतीच ८ जून रोजी पाहणी केली.

नियामक मंडळाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.

00000

किरण वाघ/विसंअ

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp