Pune | Fri, 26 June 2026

Ad

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘सारथी’ कार्यालयास भेट

Sunil Goyal | 1 views
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘सारथी’ कार्यालयास भेट

पुणे, दि.२६:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) मुख्यालयास भेट देऊन तेथील उपक्रमांची माहिती घेतली. शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, मनपा आयुक्त नवलकिशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सचिव शैला ए., विभागीय आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर, व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. महेश पाटील यांनी सारथीच्या विविध उपक्रमांची सादरीकरणाद्वारे त्यांना माहिती दिली.

०००

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp