Pune | Fri, 15 May 2026

Ad

मुंबईत पोक्सो अंतर्गत ‘सपोर्ट पर्सन’ नियुक्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Sunil Goyal | 8 views
मुंबईत पोक्सो अंतर्गत ‘सपोर्ट पर्सन’ नियुक्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. २४ : बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत बाल पीडितांना न्यायप्रक्रियेदरम्यान सहाय्य व संरक्षण देण्यासाठी ‘सपोर्ट पर्सन’ नियुक्तीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

इच्छुक उमेदवारांनी 15 दिवसांच्या आत आपले अर्ज ‘जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, 117, बी.डी.डी. चाळ, पहिला मजला, वरळी, मुंबई- 400018 या पत्त्यावर सादर करावेत. तसेच अर्ज ई-मेलद्वारे depumumbai12@gmail.com या ईमेलवर पाठविता येतील. अर्जांची छाननी झाल्यानंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीची तारीख कळविण्यात येणार आहे.

सपोर्ट पर्सनसाठी सामाजिक कार्य, समाजशास्त्र, मानसशास्त्र किंवा बालविकास विषयात पदव्युत्तर पदवी किंवा पदवीधर असून किमान तीन वर्षांचा बाल शिक्षण, विकास किंवा संरक्षण क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे. संगणक ज्ञान (एमएससीआयटी) किंवा समकक्ष प्रमाणपत्र अपेक्षित आहे. तसेच बालहक्क किंवा बालसंरक्षण क्षेत्रात कार्यरत संस्थांनाही अर्ज करता येणार असून बालगृह किंवा शेल्टर होममधील संबंधित अधिकारीही पात्र ठरू शकतात.

निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती तीन वर्षांसाठी करण्यात येणार असून दरवर्षी कामगिरीचा आढावा घेतला जाईल. आवश्यकतेनुसार जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (डीसीपीओ) यांच्या शिफारशीवर आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर कालावधी वाढविला जाऊ शकतो. वेतन कायद्यानुसार वेतन अदा करण्यात येईल.

00000

श्रध्दा मेश्राम/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp