
नवी दिल्ली, १४ : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजधानीत त्यांना अभिवादन करण्यात आले. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी विशेष आयुक्त श्वेता सिंघल, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहाय्यक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, व्यवस्थापक प्रमोद कोलापटे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी व्यवस्थापक प्रमोद कोलापटे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला.
0000
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली
