Pune | Tue, 17 March 2026

Ad

राजधानीत संत गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनी अभिवादन

Sunil Goyal | 14 views
राजधानीत संत गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनी अभिवादन

नवी दिल्ली, 23 : समाजप्रबोधनकार, स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करणारे व कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करणारे संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे यांनी कोपर्निकस मार्ग स्थित जुने महाराष्ट्र सदन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

या प्रसंगी सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, उपअभियंता किरण चौधरी, आशुतोष द्विवेदी, सहायक लेखाधिकारी निलेश केदारे, व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांच्यासह महाराष्ट्र सदन व परिचय केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी संत गाडगेबाबा महाराज यांच्या समाजप्रबोधन, स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि शिक्षण प्रसाराच्या कार्याचा परिचय करून दिला.

००००

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली–वृत्त विशेष –

 

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp