Pune | Thu, 14 May 2026

Ad

समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नांदेड-जालना मार्गासाठीचे उर्वरित भूसंपादन तातडीने पूर्ण करा –  महसूल मंत्री बावनकुळे

Sunil Goyal | 6 views
समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नांदेड-जालना मार्गासाठीचे उर्वरित भूसंपादन तातडीने पूर्ण करा –  महसूल मंत्री बावनकुळे

मुंबई, दि. २८ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नांदेड-जालना द्रुतगती मार्गासाठीचे उर्वरित भूसंपादन तातडीने पूर्ण करावे, असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

परभणी जिल्ह्यातील प्रलंबित भूसंपादनाबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, अपर मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव शरद राजभोग उपस्थित होते.

नांदेड जालना या मार्गातील परभणी जिल्ह्यातील पॅकेज ५ मधील भूसंपादनाचे आदेश झाले असून ताबा देण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. ही प्रक्रिया येत्या सात दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले. तर, पॅकेज ३ मधील सेलू तालुक्यातील भूसंपादनासाठी उच्च न्यायालयाची स्थगिती होती. स्थगिती उठवल्यानंतर प्रक्रिया पुन्हा सुरू झाली असून १० जून पर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली.

या रस्त्याच्या कामासाठी कंत्राटदाराकडून रॉयल्टी घेऊन आवश्यक गौण खनिज उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देशही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी जिल्हा प्रशासनास दिले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp