Pune | Thu, 23 April 2026

Ad

ठाणे येथील शासकीय गोवण जमिनीची मोजणी करून अहवाल सादर करावा -विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

Sunil Goyal | 12 views
ठाणे येथील शासकीय गोवण जमिनीची मोजणी करून अहवाल सादर करावा -विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

मुंबई, दि. २२: कोलशेत (ठाणे) येथील शासकीय गोवण जमिनीवरील अतिक्रमणांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे तसेच जमिनीची मोजणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

यासंदर्भातील निवेदन अजीत नथुराम पाटील यांनी सादर केले. विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे महसूल, ठाणे महानगरपालिका, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व ठाणे जिल्हा भूमिअधीक्षक यांची बैठक झाली. याप्रकरणी कायदेशीर निर्णय घेण्यासाठी जमिनीची प्रत्यक्ष पाहणी करावी. या प्रकरणाशी संबंधित सर्व विभागांनी याप्रकरणी सखोल चौकशी करावी. तसेच जमिनीची प्रत्यक्ष मोजणी व कागदपत्रांची पडताळणी करून तपशीलवार अहवाल तात्काळ सादर करावा, असे निर्देश उपाध्यक्ष बनसोडे यांनी यावेळी दिले.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp