Pune | Thu, 14 May 2026

Ad

वृद्ध कलावंतांची आधार पडताळणी तत्काळ करा- मंत्री ॲड. आशिष शेलार

Sunil Goyal | 6 views
वृद्ध कलावंतांची आधार पडताळणी तत्काळ करा- मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. २४ : राज्यातील वृद्ध कलावंतांना मानधन मिळण्यासाठी आवश्यक असलेली आधार पडताळणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून वृद्ध कलावंतांचे मानधन तत्काळ देण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य आणि इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,  येथे झालेल्या आढावा बैठकीत राज्यातील विविध जिल्ह्यांतील आपले सरकार सेवा केंद्रे’, आधार सेवा आणि वृद्ध कलावंत मानधन यासंदर्भातील विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव महेश वाव्हळ, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभिषण चवरे तसेच महाआयटी संचालक भुवनेश्वरी एस. तसेच जालना, लातूर, परभणी, बुलढाणा, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यमंत्री मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, जालना, लातूर, परभणी, बुलढाणा तसेच मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये वृद्ध कलावंतांची आधार पडताळणी संबंधित जिल्हाधिकारी यांनी तातडीने कार्यवाही करून पात्र कलावंतांना लवकरात लवकर मानधन द्यावे.राज्यातील आपले सरकार सेवा केंद्रांची तपासणी करुन त्यांची पुनर्स्थापना करावी, असे निर्देशही मंत्री ॲड.शेलार यांनी दिले.

मुंबई उपनगरात आधार सेवांची वाढती मागणी लक्षात घेता महापालिका शाळा व महाविद्यालयांमध्ये आधार केंद्रे सुरू करण्याचा पर्याय विचाराधीन ठेवण्याचे निर्देश मंत्री ॲड.शेलार यांनी दिले.

0000

संजय ओरके/ वि.सं.अ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp