Pune | Fri, 17 April 2026

Ad

वडकी येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात

Sunil Goyal | 3 views
वडकी येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची उपस्थिती

यवतमाळ, दि. 17 (जिमाका) : राळेगाव तालुक्यातील वडकी मंडळात आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर उत्साहात संपन्न झाला.

या शिबिरात आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी  मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, वय व राष्ट्रीत्व प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर यांसारखी अनेक प्रमाणपत्रे वितरित करण्यात आले. यासह  शिधापत्रिका, आधार दुरुस्ती, ई मोजणी, अॅग्रीस्टॅक, सातबारा, आठ-अ, फेरफार, पीएम किसान, इतरही दाखले व प्रमाणपत्रे वितरित करण्यात आले.

याशिवाय शिबिरात विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना योजनांची माहिती दिली. तसेच परिसरातील युवकांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले.

या शिबिराला उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार अमित भोईटे, मंडळ अधिकारी दिलीप चिडे आणि वडकी मंडळ परिसरातील नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्र्याच्या हस्ते उत्कृष्ट तीन मंडळ अधिकाऱ्यांचा सत्कार

यवतमाळ दि. 17 (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियानाअंतर्गत जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या 10 एप्रिलच्या टप्प्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील तीन मंडळ अधिकाऱ्यांचा पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.

 प्राप्त गुणांनुसार मारेगाव तालुक्यातील जळका बो. मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. घाटंजी  तालुक्यातील घोटी मंडळाने द्वितीय क्रमांक मिळविला असून यवतमाळ तालुक्यातील मोहा मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला आहे. या मंडळांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मंडळ अधिकारी श्री रघुनाथ, मानिक गोहोकर आणि विनोद अक्कलवार यांचा पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी प्रशस्तीपत्र देवून सत्कार केला.

000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp