Pune | Fri, 20 March 2026

Ad

विधानपरिषद सभापती व उपसभापती यांची सुयोग येथे भेट

Sunil Goyal | 30 views
विधानपरिषद सभापती व उपसभापती यांची सुयोग येथे भेट

नागपूर दि. ०७: विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, तसेच उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सुयोग पत्रकार निवास येथे भेट देऊन माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी सभापती प्रा. राम शिंदे, तसेच उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर सुयोग येथील पत्रकारांच्या निवास व्यवस्थेची माहिती घेऊन पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे, डॉ. विलास आठवले, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती) (प्रशासन) किशोर गांगुर्डे, संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) गोविंद अहंकारी, नागपूर-अमरावती विभागाचे संचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे आदी उपस्थित होते.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp