Pune | Tue, 21 April 2026

Ad

वसई येथे मत्स्य प्रशिक्षण केंद्रासाठी जागा निश्चिती करावी – मत्स्यव्यवसाय  व बंदरे मंत्री नितेश राणे

Sunil Goyal | 1 views
वसई येथे मत्स्य प्रशिक्षण केंद्रासाठी जागा निश्चिती करावी – मत्स्यव्यवसाय  व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. २०:-  वसई ( जि. पालघर) येथे मत्स्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी जागा निश्चित करावी. या केंद्रासाठी आवश्यक जागा मागणीचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवावा, असे निर्देश सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

पालघर जिल्ह्यातील वसई येथे मत्स्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे याविषयी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस आमदार स्नेहा दुबे, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार आदी उपस्थित होते.

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले, स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील यासाठी प्रकल्पाची अंमलबजावणी लवकर होणे गरजेचे आहे.  मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना ही महत्त्वाची योजना असून या योजनेच्या जनजागृतीसाठी  शिबिरांचे आयोजन करून  जास्तीत जास्त लाभार्थी पर्यंत ही योजना पोहचवावी, असे निर्देशही मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

मुरुड-जंजिरा नगरपरिषद हद्दीत कोळी समाजाच्या विविध मागण्या संदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली. या बैठकीस पर्यटन विभागाचे सचिव संजय खंदारे उपस्थित होते.

या बैठकीत मच्छी सुकविण्यासाठी जागा, जाळी व बोटी दुरुस्ती केंद्रे, कोळी खेड्यांचा विकास तसेच पर्यटनाला चालना देणारे प्रकल्प यावर चर्चा करण्यात आले.

‘बॅक वॉटर’ प्रकल्पाच्या माध्यमातून आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पर्यटन विभाग व मत्स्य व्यवसाय विभागाकडे प्रस्ताव सादर करावा. याबाबत जिल्हाधिकारी रायगड यांनी सर्व संबंधितांची बैठक घेण्याचे निर्देश श्री.राणे यांनी दिले.

मच्छीमार संस्थांना मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची माहिती देण्यात यावी. त्यासाठी शिबिरांचेही आयोजन करण्यात यावे असे निर्देशही मत्स्यव्यवसाय मंत्री राणे यांनी दिले.

००००००

एकनाथ पोवार/स.सं

 

आमच्यात सामील व्हा

ताज्या बातम्या
Youtube

Join WhatsApp