Pune | Mon, 22 June 2026

Ad

‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेच्या अंकाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांच्या हस्ते प्रकाशन

Sunil Goyal | 1 views
‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेच्या अंकाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या “आपलं मंत्रालय” या गृहपत्रिकेच्या जून 2026 या अंकाचे प्रकाशन महिला व बालकल्याण विभागाचे सचिव तथा अतिथी संपादक डॉ. अनुपकुमार यादव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव (मावज) अजय भोसले, माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या उपसंचालक (वृत्त) वर्षा फडके-आंधळे, आदी अधिकारी उपस्थित होते.

आपलं मंत्रालय’ च्या या अंकामध्ये  विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरणीय आणि विकासाभिमुख घडामोडींचा आढावा घेण्यात आला आहे. शासनाच्या लोककल्याणकारी धोरणांचा, सांस्कृतिक वारशाच्या जतन-संवर्धनाचा तसेच शिक्षण, विज्ञान, पर्यावरण आणि नवकल्पनांच्या क्षेत्रातील सकारात्मक बदलांचा वेध या अंकातून घेण्यात आला आहे. बदलत्या काळातील आव्हाने आणि संधी नागरिकांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व नोंदवणारे तसेच ज्ञान, संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि विकासाचा समतोल साधणारे लेख विशेष आकर्षण ठरणारे आहेत.

मंत्रालयातील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

0000

अश्विनी पुजारी/स.सं.

 

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp