
मुंबई, दि.२२ : पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्यासह विधानसभेचे माजी सदस्य दिवंगत सदस्यांना विधानसभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
माजी विधानसभा सदस्य व माजी मंत्री अनंतराव नारायण थोपटे, विधानसभा माजी सदस्य विठ्ठलराव लक्ष्मणराव धोटे, बळीराम कडुजी कोटकर-पाटील, कृष्णराव नानासाहेब देशमुख, पटल्या लंगडा मावसकर, वसंतराव दोधा सूर्यवंशी, सुरेशकुमार कन्हैयालाल जेथलिया, उषादेवी कृष्णराव जगदाळे व शकुंतला नंदकिशोर शर्मा यांच्या निधनाबद्दल अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी शोक प्रस्ताव मांडला आणि दिवंगत सदस्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
०००
एकनाथ पोवार/स.सं.
