Pune | Thu, 14 May 2026

Ad

पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन

Sunil Goyal | 8 views
पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन

हिंगोली, दि. १: येथील जिल्हा कोषागार कार्यालयासमोरील तालुका क्रीडा संकुलामध्ये उभारण्यात आलेल्या बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय मंत्री तथा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी बैडमिंटन खेळण्याचा आनंद घेतला.

यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, प्र.जिल्हा क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्यासह क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा प्रेमी नागरिक उपस्थित होते.

००००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp